वृक्ष संवर्धन अभियान : विकासार्थ विद्यार्थ्यांच्या वृक्षमित्रांकडून NDA टेकडीवर 2000 वृक्षांची लागवड

372 0

पुणे : विकासार्थ विद्यार्थी (SFD), राष्ट्रीय सेवा योजना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि महाराष्ट्र शासन वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने NDA टेकडी वर एक कोटी वृक्षलागवड व वृक्ष संवर्धन अभियाना अंतर्गत दिनांक २५ जुलै ला २००० वृक्षांची लागवड करण्यात आली.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्र-कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे सर आणि अभाविप पश्र्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे उपस्थित होते.विकासार्थ विद्यार्थ्यांच्या वृक्षमित्रांकडून NDA टेकडी येथे २००० वृक्षांची लागवड

या अभियानात २७५ वृक्ष मित्रांनी सहभागी होऊन भर पावसात वृक्षरोपण केले. मॉडर्न कला ,वाणिज्य , विज्ञान व विधी महाविद्यालय तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थी या मध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले.

विकासार्थ विद्यार्थी – STUDENTS FOR DEVELOPMENT ही अभाविपची गतिविधि पर्यावरण क्षेत्रात काम करते. या गतिविधि अंतर्गत देशभरात १ कोटी वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. या अभियाना अंतर्गत पुण्यातील विविध ठिकाणी २५,००० झाडांचे रोपण व संवर्धन करण्यात येणार आहे. यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी परीक्षा सुरू असताना सुद्धा वृक्षमित्र म्हणून मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.

यामुळे पर्यावरण विषयात विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण होत असून पर्यावरणाप्रती प्रेम वाढताना दिसत आहे. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या अभियानात सहभागी होऊन पर्यावरण संरक्षण करण्यास हातभार लावावा असे आवाहन यावेळी अभाविप प्रदेशमंत्री अनिल ठोंबरे यांनी केले.

अभाविप ही एकमेव विद्यार्थी संघटना आहे की जी विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवते, गरज पडल्यास आंदोलन करते पण त्याच बरोबर राष्ट्राच्या विकासासाठी विधायक कार्य सुद्धा करते. आज प्रत्यक्षात या अभियानात सहभागी होता आले याचा मनस्वी आनंद होत आहे असे मत सा.फु.पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू सोनावणे सरांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र शासन वन विभाग आणि विद्यापीठ प्रशासन विधायक कार्याला नक्कीच मदत करेल, असे मत महेश ठाकूर सरांनी व्यक्त केले. यावेळी अभाविप प्रदेश उपाध्यक्ष डॉ.शरद गोस्वामी सर, प्रा. संतोष परचुरे सर संचालक विद्यार्थी कल्याण मंडळ,मॉडर्न कॉलेज एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. वऱ्हाडे सर, SFD प्रदेश संयोजक प्रसाद आठवले आणि अन्य विद्यार्थी उपस्थित होते.

Share This News
error: Content is protected !!