BREAKING : डी.एस.कुलकर्णींचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा ; सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

309 0

पुणे : पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. अशी माहिती डी.एस.कुलकर्णींचे वकील अशितोष श्रीवास्तव यांनी दिली आहे.त्यामुळे कुलकर्णी यांचा बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे

सिंहगड पोलीस स्थानकामध्ये ऑगस्ट 2016 रोजी दाखल तक्रारीनुसार कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नीने घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांकडून आगाऊ रक्कम घेतली, परंतु त्यानंतर ग्राहकांना घराचा मालकी हक्क हस्तांतरित केला नाही. या प्रकरणी कुलकर्णी यांना 5 मार्च 2019 रोजी अटक करण्यात आली होती.

पाच दिवसांपूर्वीच सदनिकांच्या मालकी हक्का संदर्भात महाराष्ट्र ओनरशिप ऑफ फ्लॅट्सऍप अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये पुणे न्यायालयाने गुरुवारी जामीन मंजूर केला. याच प्रकरणातील प्रमुख केसमध्ये जामीन मंजूर झाला असल्याचं श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले. त्यामुळे कुलकर्णी यांचा बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे

या प्रकरणातील गुन्ह्यासाठी कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नीने अर्धी शिक्षा भोगली आहे . मुख्य प्रकरणातील FRI संदर्भात सर्वोच्च न्यायालयासमोर अर्ज दाखल करण्यात आला होता. याची सुनावणी आज झाली , त्यानुसार डी.एस. कुलकर्णी यांचा बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Share This News
error: Content is protected !!