पुण्यात पुन्हा एकदा बॉम्ब सदृश्य वस्तू ? पोलिसांनी दिले स्पष्टीकरण…

392 0

पुणे : पुण्यामध्ये पुन्हा एकदा बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्याने एकच गोंधळ उडाला होता . ही बॉम्ब सदृश्य वस्तू एका नागरिकाला दिसून आली आणि या नागरिकांनीच पोलिसांना या वस्तू विषयी माहिती दिली. या प्रत्यक्षदर्शीने व्यक्त केलेला संशय खरा ठरला आहे .

दरम्यान मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार , हवेली तालुक्यातील मांजरी खुर्द येथील अण्णासाहेब मगर कॉलेजच्या उजव्या बाजूला ही बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आली होती. घटनेची माहिती मिळताच मांजरी खुर्द या ठिकाणी पोलिसांचे बॉम्बशोधक पथक दाखल झाले. या वस्तूची योग्य तपासणी झाल्यानंतर हा जुना ग्रेनेड असल्याचे निष्पन्न झाले आहे .

दरम्यान सात ते आठ वर्षांपूर्वी या परिसरामध्ये भराव टाकण्यात आला होता . हाच भरावाच आता पावसामुळे वर येत असल्याने अशा वस्तू आढळून येत आहेत. दरम्यान बॉम्बशोधक पथकाने हे ग्रॅनाईट निकामी केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

Share This News
error: Content is protected !!