PUNE CRIME : एकतर्फी प्रेमातून त्याने बनवला ‘खोटा निकाहनामा’ ; मुलीच्या कुटुंबीयांना समजल्यावर घडले असे काही….!

404 0

पुणे : पुण्यामध्ये एक विचित्र घटना उघडकीस आली आहे . यामधील दोन आरोपींविरुद्ध 23 वर्षीय तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार , प्रमुख आरोपी इमरान समीर शेख हा 38 वर्षीय इसम या 23 वर्षीय तरुणीच्या प्रेमात पडला . परंतु या तरुणीने इम्रान याच्याशी लग्न करण्यास साफ नकार दिला. त्यानंतर आरोपी इम्रान याने तरुणीची बदनामी करण्याच्या उद्देशाने तिच्यासोबत थेट निकाह झाला असल्याचे सिद्ध करण्यासाठी बनावट निकाहनामा आणि बनावट मॅरेज सर्टिफिकेट तयार करून घेतले. एवढेच नाही तर समाजामध्ये त्यांच्या खोट्या लग्नाची बातमी पसरवण्यासाठी त्याने हा निकाहनामा व्हायरल देखील केला .

या घटनेची माहिती तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांना मिळताच त्यांनी थेट पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि चंदननगर पोलीस ठाण्यामध्ये प्रमुख आरोपी इमरान शेख यांच्यासह शेख खलील शेख जलील या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इमरान शेख आणि ही तरुणी यांच्यामध्ये वयाचे मोठे अंतर होते . त्यामुळे तिला हे लग्न मान्य नव्हते ,परंतु तिच्यावर लग्नाचा दबाव टाकण्यासाठीच या व्यक्तीने असे पाऊल उचलले.

Share This News
error: Content is protected !!