INDIA TODAY : भारताच्या 15 व्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांचा शपथविधी संपन्न ; सर्वात कमी वयाच्या राष्ट्रपती होण्याचा रेकॉर्ड

265 0

नवी दिल्ली : भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून आज द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली आहे. सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती भवन येथे पोहोचल्या. मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांचे स्वागत केले. आणि त्यांना रीतीनुसार गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला . त्यानंतर देशाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रामण्णा यांनी द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाची शपथ दिली.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना द्रोपदी मुर्मू या भावनिक झाल्या होत्या. आपल्या भाषणादरम्यान त्या म्हणाल्या की , “स्वतंत्र भारतात जन्मलेली मी देशाची पहिली राष्ट्रपती देखील आहे. आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी स्वतंत्र भारतातील नागरिकांकडून ज्या अपेक्षा ठेवल्या होत्या, त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला या अमृतकालामध्ये वेगाने काम करावे लागेल. या 25 वर्षात अमृतकाल प्राप्तीचा मार्ग दोन मार्गांवर पुढे जाईल प्रत्येकाचे प्रयत्न आणि प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

यावेळी संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला मंत्री परिषदेचे सदस्य आधी उपस्थित होते.

Share This News
error: Content is protected !!