“भाभीजी घर पर है” या प्रसिद्ध मालिकेतील अभिनेत्याचे निधन ; वयाच्या 41 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…

724 0

मुंबई : टीव्ही इंडस्ट्री मधून एक धक्कादायक माहिती समोर येते आहे . सिद्धार्थ शुक्ला या तरुण अभिनेत्याच्या अचानक निधनानंतर वयाच्या अवघ्या 41 व्या वर्षी या अभिनेत्याने अचानक जगाचा निरोप घेतला आहे . ‘भाभीजी घर पर है’ सारख्या टीव्ही शो मधील मलखांची भूमिका करणारा अभिनेता दीपेश भान याचे निधन झाले आहे.

Bhabhi Ji Ghar Par Hain Malkhan Gets Such A Fee For Doing Every Episode | Bhabhi Ji Ghar Par Hain के मलखान को हर एपिसोड को करने के लिए मिलती है इतनी

शनिवारी क्रिकेट खेळत असताना दीपेशला अचानक चक्कर आली, आणि तो जमिनीवर पडला. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
स्वतःच्या फिटनेसची काळजी करणारा आणि निर्व्यसनी अशा या अभिनेत्याला वयाच्या 41 व्या वर्षी जगाचा निरोप घ्यावा लागला. याचे दुःख त्याच्या सहकारी कलाकारांना पचवता येत नाहीये.

कविता कौशिक यांनी एक ट्विट करून दिपेशला आदरांजली वाहिली आहे. टीव्ही इंडस्ट्री मधील अनेक दिग्गज कलाकारांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली. दीपेशचे 2019 मध्ये लग्न झाले होते . तर त्याला एक मुलगा देखील आहे .

त्याच्या अचानक जाण्याने त्याच्या कुटुंबाला आणि सहकलाकारांना धक्का बसला आहे.

Share This News
error: Content is protected !!