New syllabus implemented : सनदी लेखापाल होण्यासाठी आता दोन वेळा ‘आर्टिकलशिप’

116 0

‘इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्‌स ऑफ इंडिया’द्वारे (आयसीएआय) नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे. नवीन अभ्यासक्रमात अधिकाधिक ‘प्रॅक्टिकल’, ‘क्रिप्टोकरन्सी’सारखा अद्ययावत विषय तसेच संपूर्ण अभ्यासक्रमादरम्यान दोनवेळा ‘आर्टिकलशिप’चा (इंटर्नशिप) समावेश राहणार आहे.

वाणिज्य क्षेत्रातील बदल, अभ्यासक्रमाकडून असलेली अपेक्षा, वस्तू व सेवा कायदा (जीएसटी) आदींचा विचार करीत हा अभ्यासक्रम पहिल्यांदा दहा वर्षे पूर्ण होण्यापूर्वी म्हणजेच अवघ्या पाच वर्षांतच बदलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने नवीन अभ्यासक्रम अंतिम टप्प्यात आहे.

अभ्यासक्रमाला प्राथमिक मंजुरी मिळाली आहे. प्रक्रियेनुसार, अंतिम मसुद्यावर हरकती, सूचना मागवून झाल्या आहेत. त्यात ‘आयसीएआय’च्या सर्व शाखा, विद्यार्थ्यांनी आपापले आक्षेप, सूचना पाठविल्या आहेत. त्यांचा समावेश करून अभ्यासक्रम संसदेकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे. संपूर्ण देशात नवीन अभ्यासक्रमाबाबत चर्चा आहे.

यासंदर्भात अधिक सांगताना ‘आयसीएआय’च्या अधिकारी म्हणाले, ‘नवीन अभ्यासक्रमामध्ये वर्तमान स्थितीतील आर्थिक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. जास्तीत जास्त ‘प्रॅक्टिकल’चा अंतर्भाव असणार आहे. आता ‘सीए’ अभ्यासक्रम सुरू असताना आणि पूर्ण झाल्यावर अशी दोन वेळा ‘आर्टिकलशिप’ बंधनकारक राहणार आहे.

Share This News
error: Content is protected !!