Educational : “कोणतेही करिअर कमी महत्त्वाचे नाही ,बदलत्या जगात स्वतःची भूमिका निश्चित करा”…!-शिक्षण आयुक्त सूरज मांढरे

227 0

पुणे : करिअरच्या महत्त्वाच्या टप्प्यात योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याने यशस्वी होण्याची अधिक शक्यता वाढते. कोणतेही करिअर कमी महत्त्वाचे नाही. जग वेगाने बदलत आहे. त्यात स्वतःची भूमिका निश्चित करा. असे मत शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी व्यक्त केले.

प्रशासकीय सेवेतील उल्लेखनीय कामगिरीसाठी मांढरे यांचा आणि अमरावती-अकोला मार्गावर 75 किलो मीटरचा रस्ता विक्रमी वेळेत पूर्ण करून ‘गिनीस बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झालेल्या उद्योजक जगदीश कदम यांचा ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’च्या (डीईएस) वतीने गौरव करण्यात आला. यावेळी मांढरे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत होते.

‘डीईएस’च्या नियामक मंडळ आणि परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे अध्यक्षस्थानी होते. कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, प्रबंधिका डॉ. सविता केळकर, फर्ग्युसनच्या उपप्राचार्या प्रा. स्वाती जोगळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कदम म्हणाले, ‘व्यवसायात पैशाच्या मागे लागू नका. लक्ष्मी हवी असेल तर, सरस्वतीची आराधना करा. विद्येच्या आराधनेतून यश आणि पैसा आयुष्यभर पाठीशी राहील.’

Share This News
error: Content is protected !!