Vice Presidential Election :..”म्हणून आम्ही एकाही उमेदवाराला मतदान करणार नाही “! ; ममता बॅनर्जी यांच्या तटस्थ भूमिकेने यूपीएच्या उमेदवार मार्गरेट अल्वा यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह

193 0

Vice Presidential Election : गुरुवारी राष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक पार पडली. यात भाजप पुरस्कृत उमेदवार द्रौपदी मुर्मू विजयी झाल्या असून , भारताच्या १५ राष्ट्रपती म्हणून त्यांना बहुमान मिळाला आहे.

येत्या 6 ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपती पदासाठीची निवडणूक होणार आहे. निवडणुकीची मोर्चे बांधणी सुरू असतानाच, एक मोठी बातमी समोर येते आहे. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान ‘न’ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

दरम्यान ” उमेदवार निवडताना आम्हाला विश्वासात घेतले नसल्याच्या कारणामुळे आम्ही एकाही उमेदवाराला मतदान करणार नसल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.” त्यामुळे यूपीएच्या उमेदवार मार्गरेट अल्वा यांच्या उमेदवारीसाठीच आता साशंकता निर्माण झाली आहे.
६ ऑगस्टला उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होणार आहेत.

यासाठी जयदीप धनखड आणि मार्गरेट अल्वा यांच्यामध्ये लढत होणार आहे. परंतु ममता बॅनर्जी यांच्या तटस्थ भूमिकेमुळे मतदाना आधीच युपीए मध्ये अंतर्गत राजकीय चढाओढीमुळे वादंग निर्माण झाला आहे. याचा फायदा एनडीएच्या उमेदवाराला होणार असल्याचे संकेत आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!