President Draupadi Murmu : “ताईने लहानपणापासूनच संघर्ष पाहिला…!” राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भावाची भावनिक प्रतिक्रिया , म्हणाले…
President Draupadi Murmu : देशातील राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणूकीची मतमोजणी काल पार पडली. यामध्ये एनडीएच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू या विजयी झाल्या आहेत. द्रौपदी मुर्मू या आदिवासी समुदायातील महिला देशाच्या सर्वोच्च स्थानी विराजमान होत आहेत. त्यामुळे देशातील राजकीय व्यक्तिमत्त्वासह सामान्य नागरिकांनी देखील आनंद व्यक्त केला आहे.

नुकतीच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे बंधुराज तारिणीसेन टुडू यांनी आपल्या बहिणीच्या विजयाविषयी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावेळी तारिणीसेन टुडू म्हणाले की , “माझी ताई एक आदिवासी महिला राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयी झाली आहे. आम्हाला यापेक्षा जास्त आनंद काय असू शकतो… ओडीसात अनेकांना आनंद झाला ,कारण त्यांनी ताईचा लहानपणापासूनचा संघर्ष पाहिला आहे . तिचा हा प्रवास सगळ्यांसाठीच प्रेरणा स्त्रोत आहे” असे ते म्हणाले आहेत . तर शनिवारी द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार असल्याचे देखील ते म्हणाले आहेत.
