Presidential election : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू या विजयी झाल्या आहेत. राष्ट्रपतीपदावर पहिल्या आदिवासी महिला म्हणून त्यांना बहुमान मिळाला आहे . राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी 18 जुलै रोजी मतदान घेण्यात आलं होतं . आज मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर द्रौपदी मुर्मू यांना विजयी घोषित करण्यात आले आहे.
देशाचे सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाल 24 जुलै रोजी समाप्त होत आहे . द्रौपदी मुरमु या 25 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची शपथ घेणार आहेत. यूपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा या निवडणुकीमध्ये पराभव झाला असून , मतमोजणीपूर्वीच द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जात होता.
मतमोजणीच्या पहिल्या फेरीत एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांना 540 मतं मिळाली तर यूपीएचे उमेदवारी यशवंत सिन्हा यांना 208 मते मिळाली होती . दुसऱ्या फेरीमध्ये द्रौपदी मुर्मू यांना 1349 मते मिळाली ,तर यशवंत सिन्हा यांना 537 मध्ये मिळाली आहेत. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू या विजयी झाल्या आहेत.