President Draupadi Murmu : नगरपंचायत नगरसेविका ते भारताच्या ‘राष्ट्रपती’ ; असा आहे राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू यांचा जीवनप्रवास…!

150 0

नवी दिल्ली : भारतातील राजकारणात राज्यपाल म्हणून नियुक्त झालेल्या ओडिशातील झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल आणि पहिल्या आदिवासी नेत्या म्हणून द्रौपदी मुर्मू यांची खास ओळख आहे. विशेष म्हणजे त्या मूळ ओडिशा राज्यातील असून 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या झारखंडच्या पहिल्या राज्यपाल आहेत.2022 राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भाजपने मुर्मू यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे भारताच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून घोषित केले आहे.जाणून घेऊयात द्रौपदी मुर्मू यांचा जीवनप्रवास…

द्रौपदी मुर्मू यांचा जन्म 20 जून 1958 रोजी ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावामध्ये झाला आहे. त्यांच्या वडिलांचे नाव बिरांची नारायण तुडू आहे. द्रौपदी मुर्मू ह्या ओडिसातील संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहेत. विशेष म्हणजे त्यांचे वडील आणि आजोबा दोघेही पंचायती राज प्रणाली अंतर्गत गावप्रमुख होते. इ.स. 1997 मध्ये भुवनेश्वरच्या रमादेवी महिला विद्यापीठातून द्रौपदी मुर्मू यांनी कला शाखेतील पदवी प्राप्त केली.द्रौपदी मुर्मू यांचा विवाह श्याम चरण मुर्मू यांच्याशी झाला आहे .

द्रौपदी मुर्मू यांनी ओडिशा सरकारसाठी लिपिक म्हणून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात केली. पुढे त्या पाटबंधारे आणि ऊर्जा विभागात कनिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत होत्या. नंतरच्या काळात त्यांनी शिक्षिका म्हणूनही काम केले.त्यांनी श्री अरबिंदो इंटिग्रल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर, रायरंगपूर येथे मानद शिक्षिका म्हणून काम केले आहे.

1997 मध्ये रायरंगपूर नगर पंचायतीच्या नगरसेविका म्हणून द्रौपदी मरमु या निवडून आल्या होत्या. त्यांनी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा म्हणून देखील काम केले आहे.

ओडिशातील भारतीय जनता पक्ष आणि बिजू जनता दल युती सरकारच्या काळात, त्या 6 मार्च 2000 ते 6 ऑगस्ट 2002 पर्यंत वाणिज्य आणि परिवहन राज्यमंत्री तर 6 ऑगस्ट 2002 ते 16 मे 2004 पर्यंत मत्स्यव्यवसाय आणि पशु संसाधन विकास राज्यमंत्री म्हणून त्यांनी पद भूषवले आहे. तर 2000-2004 आणि 2004-2009 मध्ये रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातील आमदार देखील त्या होत्या. त्यांना 2007 मध्ये ओडिशा विधानसभेने ‘सर्वोत्कृष्ट आमदार’ म्हणून नीलकंठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

द्रौपदी मुर्मू 2022 च्या भारतीय राष्ट्रपती निवडणुकीसाठी त्या भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या अधिकृत उमेदवार आहेत. भारताच्या राष्ट्रपतीपदासाठी नामनिर्देशित होणाऱ्या अनुसूचित जमातीच्या (आदिवासी) त्या दुसऱ्या व्यक्ती आहेत.

Meet Draupadi Murmu, BJP-led NDA candidate for race to Raisina Hills

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!