Maharashtra Politics : OBC समाजाचे राजकीय प्रतिनिधित्व कायम राहावे ,यासाठी आम्ही प्रयत्न केले…! – जयंत पाटील

198 0

मुंबई : आज सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास मंजुरी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यातील ओबीसी समाजासाठी हा मोठा दिलासा मानला जातोय.

दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने येत्या दोन आठवड्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश देखील दिले आहेत. या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. कोर्टाच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे, या ट्विटमध्ये ते म्हणतात की ,

“राज्यात ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्यास मान्यता देण्याच्या माननीय सर्वोच्य न्यायालयाच्या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो.मविआ सरकारने सदर आरक्षण टिकवण्यासाठी मेहनत घेतली होती.ओबीसी समाजाचे राजकीय प्रतिनिधित्व कायम राहावे यासाठी आम्ही प्रयत्न केले व त्यास यश आल्याचे समाधान आहे.”

ओबीसी समाजाला न्याय मिळावा , आरक्षणाशिवाय निवडणूक होऊ नये अशी राष्ट्रवादीची भूमिका होती. बांठिया आयोग हा महाविकास आघाडी सरकारने नेमला होता. त्यामुळे आता निवडणूक आयोगानं ताबडतोब निवडणूक जाहीर करावी, अशी मागणी देखील जयंत पाटील यांनी केली आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide