Maharashtra Political crisis : ‘त्या’ आमदारांच्या भवितव्यावर 1 ऑगस्ट रोजी सुनावणी – सुप्रीम कोर्ट

320 0

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील एकंदरीत घडणाऱ्या राजकीय वादळावर १ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी सुप्रीम कोर्टाने 29 जुलै पर्यंत प्रतिज्ञापत्र आणि कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश एकनाथ शिंदे गट आणि शिवसेनेला दिले आहेत.

सुप्रीम कोर्टामध्ये एकनाथ शिंदे गट आणि शिवसेनेने दाखल केलेल्या याचीकेवर सरन्यायाधीश रम यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली दरम्यान शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल आणि शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांनी कोर्टापुढे आपला युक्तिवाद केल्यानंतर पुढची तारीख मागितली कोर्टाने पुढील सुनावणी एक ऑगस्ट रोजी होईल असे सांगितले आहे.

या सुनावणी दरम्यान सरन्यायाधीशांनी हे प्रकरण मोठ्या खंडपीठांसमोर निर्णय गरजेचं असल्याचं देखील स्पष्ट केले आहे अद्याप त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नसला तरीही सरन्यायाधीश रमण्णा यांनी दोन्हीही पक्षकारांच्या वकिलांच्या युक्तिवादानंतर टिप्पणी करताना म्हटले आहे की, ” गटनेता बदलणे हा पक्षाचा अधिकार आहे. त्यासह बहुमताने सदस्य निवडू शकतात . एखादा वाद उद्भवल्यास विधानसभा अध्यक्ष हस्तक्षेप करू शकतात असे त्यांनी म्हटले आहे. “

Share This News
error: Content is protected !!