CM EKNATH SHINDE PRESS CONFERENCE : “दिल्लीत येण्यास कारण की…” (Video)

262 0

दिल्ली : राज्यातील राजकीय उलथापालथीनंतर आता शिवसेनेला थेट केंद्रातही मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे 12 खासदार आज शिंदे गटामध्ये सामील झाले आहेत आज बारा खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन आपला वेगळा गट स्थापन करण्यास मान्यता देण्याच्या मागणीसह आपल्या गटाला बसण्यासाठी वेगळी जागा देण्याची मागणी देखील केली आहे.

या खासदारांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली आहे.  यावेळी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते मुख्य प्रतोद भावना गवळी ,कृपाल तुमाने, सदाशिव लोखंडे, हेमंत गोडसे ,प्रतापराव जाधव ,संजय मंडलिक ,धैर्यशील माने, हेमंत पाटील, आप्पा बारणे, राजेंद्र गावित, श्रीकांत शिंदे या सर्व 12 खासदारांच्या वतीने आज लोकसभा अध्यक्षांकडे पत्र देण्यात आला आहे.

या बारा खासदारांच मी मनापासून स्वागत करतो. मी दिल्लीत येण्याचं हे एक कारण होतं. त्यासह ओबीसी आरक्षणावर उद्या सुनावणी असून त्यासाठी देखील मी आलो आहे वकिलांची भेट मी घेतली आहे असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केला आहे.

Share This News
error: Content is protected !!