नवी दिल्ली – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्लीत शिवसेनेच्या (शिंदे गट) 12 खासदारांची भेट घेतली आहे. एकनाथ शिंदे हे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी शिवसेनेच्या खासदारांची भेट घेतली.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता पक्षाच्या १९ पैकी १२ खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना एक पत्र सादर केले आहे. त्यात त्यांनी १२ खासदारांचा स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळावी अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या बंडखोर गटात सामील झालेल्या १२ खासदारांनी मंगळवारी सकाळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना याबाबत पत्र सादर केले. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत शिवसेनेच्या १२ खासदारांची भेट घेतली आहे.