Ministry of Mines : देशाच्या खनिज उत्पादनात 10.9% वाढ

231 0

नवी दिल्ली : मे, 2022 महिन्यात खाण आणि खनिज क्षेत्राच्या खनिज उत्पादनाचा निर्देशांक 120.1 वर पोहोचला होता. मे 2021 मधील पातळीच्या तुलनेत ही वाढ 10.9% जास्त आहे. तर, एप्रिल-मे, 2022-23 या कालावधीतली एकत्रित वाढ, गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 9.4 टक्के इतकी नोंदली गेली आहे.

भारतीय खाण ब्युरोने जारी केलेल्या (IBM) च्या प्राथमिक आकडेवारीनुसार, मे 2022 मध्ये महत्त्वाच्या खनिजांची उत्पादन पातळी पुढील प्रमाणे होती:

कोळसा 712 लाख टन,

लिग्नाइट 42 लाख टन,

नैसर्गिक वायू (वापरलेला) 2846 दशलक्ष घन. मी.,

पेट्रोलियम (कच्चे) 26 लाख टन,

बॉक्साइट 2276 हजार टन,

क्रोमाईट 320 हजार टन,

तांबे 8 हजार टन,

सोने 97 किलो,

लोह खनिज 221 लाख टन,

शिसे (कॉन्सट्रेटेड) 30 हजार टन,

मॅंगनीज 235 हजार टन,

जस्त (कॉन्सट्रेटेड) 129 हजार टन,

चुनखडी 348 लाख टन,

फॉस्फोराईट 143 हजार टन,

मॅग्नेसाइट 8 हजार टन

हीरे 22 कॅरेट.

Share This News
error: Content is protected !!