इंग्लंड खेळ जगत : ‘या’ कारणाने Ben Stokes या अष्टपैलू खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा

331 0

इंग्लंड: इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्सने एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. या अष्टपैलू खेळाडूने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. मंगळवारी होणारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पहिली वनडे ही त्याची शेवटची वनडे असेल.

“हा निर्णय घेणे जितके कठीण होते तितके वास्तव मान्य करणे कठीण नाही, मी या फॉर्मेटमध्ये माझ्या संघसहकाऱ्यांना माझे 100% देऊ शकत नाही. या वस्तुस्थितीला सामोरे जाणे इतके कठीण नाही,” स्टोक्सने जाहीर केले.”

31 वर्षीय स्टार अष्टपैलू खेळाडूने इंग्लंडकडून 104 एकदिवसीय सामने खेळले आहेत . आणि यादरम्यान त्याने संघाच्या विजयात अनेक वेळा योगदान दिले. 2019 मध्ये इंग्लंडला एकदिवसीय विश्वचषक जिंकण्यात मदत करण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली आणि लॉर्ड्सवर खेळलेल्या अंतिम सामन्यात तो सामनावीर ठरला. स्टोक्स त्याच्या घरच्या मैदानावर शेवटचा वनडे खेळणार आहे.

Share This News
error: Content is protected !!