संतापजनक…! पुण्यात स्कूलबस चालकानेच केला अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार ; पालकांमध्ये भीतीचे वातावरण

572 0

पुणे : पुण्यामध्ये पुन्हा एकदा बलात्काराची विक्षिप्त घटना घडली आहे. एका स्कूलबस चालकानेच अल्पवयीन विद्यार्थिनीचा बलात्कार केला आहे . त्यामुळे विद्यार्थिनींची सुरक्षा यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, दहावीत शिकणारी ही विद्यार्थिनी ज्या स्कूल बस मधून ये जा करत होती. या विद्यार्थिनीचे आणि या बस चालकाची चांगली ओळख झाली होती. या आरोपीने विद्यार्थिनीला प्रपोज देखील केले होते.

घटनेच्या दिवशी त्याने तिला रिलेशनशिपमध्ये राहणार का ? असे विचारले आणि बळजबरीने एका पडक्या इमारतीमध्ये घेऊन जाऊन तिच्यावर बळजबरी केली आहे.

याप्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून,पाक्सो ऍक्ट अंतर्गत देखील आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Share This News
error: Content is protected !!