BREAKING : इंदोरहून पुण्याला येणाऱ्या बसचा भीषण अपघात ; 12 प्रवाशांचा मृत्यू

782 0

इंदोर; मध्य प्रदेश : मध्यप्रदेश मधील इंदोर मधून एक धक्कादायक माहिती समोर येते आहे. मध्य प्रदेश मधील धार जिल्ह्यात इंदोर येथून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या एसटी बसला भीषण अपघात झाला आहे. एसटी महामंडळाची ही बस खलघाट संजय सेतू पुलावरून थेट नदीत कोसळली आहे. या अपघातामध्ये 12 प्रवासी मृत्युमुखी पडल्याचे समजते. तर १५ जणांना वाचवण्यात यश आले आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार , मध्यप्रदेश मधील धार जिल्ह्यात सकाळी १० च्या सुमारास हा भीषण अपघात घडला आहे. या बसमधून 50 प्रवासी प्रवास करत होते. बस खलघाट संजय सेतू पुलावरून थेट नर्मदा नदीमध्ये कोसळले आहे. नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आहे. अशामध्ये 12 प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले असून,अपघातग्रस्त बस क्रेनच्याच्या सहाय्याने नदी मधून बाहेर काढण्यात आली आहे. एनडीआरएफ कडून बचाव कार्य सुरू आहे.

Share This News
error: Content is protected !!