Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीसंदर्भात सुप्रिया सुळेंची टीका, म्हणाल्या…

283 0

 

पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेतली. तब्बल तीन तास देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये चर्चा झाली. ही भेट दोन दिवसांपूर्वी होणार होती मात्र पाऊस असल्याने हो भेट दोन दिवस पुढे ढकलण्यात आली होती. शिवतिर्थ भेट झाली असून राजकीय चर्चा आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस केली.

उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची पहिल्यांदा भेट घेतली. फडणवीस आणि ठाकरेंच्या भेटीसंदर्भात खासदार सुप्रिया सुळेंना प्रतिक्रिया कळवली आहे. 105 आमदार असलेले 1 आमदार असलेल्यांच्या घरी जातात अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीवर दिली. सध्या महाराष्ट्रात जे राजकारण सुरू आहे ते महाराष्ट्राला शोभणारं नाही आहे, असे देखील त्या यावेळी म्हणाल्या.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide