Pune Crime News : चोरीची 9 वाहने हस्तगत करण्यात गुन्हे शाखेला यश ; 4 लाख 50 हजारची वाहने जप्त

297 0

पुणे : पुणे शहर आणि परिसरामध्ये दुचाकी वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. याच पार्श्वभूमीवर दुचाकी वाहन चोरीला आळा बसावा या उद्देशाने मोहीम राबवून कारवाई करण्याचे आदेश पुणे पोलीस आयुक्तांनी दिले होते.
त्यानुसार गुन्हे शाखा युनिट ६ च्या पोलीस पथकाने हद्दीमध्ये गस्त घालत असताना बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे एक रेकॉर्डवरील गुन्हेगार हा चोरीची मोटरसायकल घेऊन मांजरी स्मशानभूमी जवळ असल्याचे समजले.
त्यावरून सापळारचून आरोपी समाधान जगताप यास दुचाकीसह ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता,त्याने कोथरूड,चंदननगर लोणीकंद,लोणी काळभोर,कोंढवा,अलंकार,हडपसर,तळेगाव आणि यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वाहने चोरल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून ही ४ लाख 50 हजार रुपये किमतीची वाहने जप्त करण्यात आली आहेत.

Share This News
error: Content is protected !!