आपला महाराष्ट्रराजकारण

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर भेट देऊन अभिवादन

मुंबई : गुरुपौर्णिमेनिमित्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील स्मृती स्थळावर भेट देऊन अभिवादन केले.

यासाठी शिंदे समर्थक आमदार तसेच दादर,प्रभादेवी आणि माहीम परिसरातील शिंदे समर्थक आमदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी येणार म्हणून आमदार सदा सरवणकर यांनी जोरदार तयारी केली होती. परिसरात मोठे बॅनर्स लावून त्यावर “बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणार नाहीच” ,”विझणार कधीच अंगार नाही”, “हिंदुत्व शिवाय विचार नाही” असे लिहिले आहे.

दरम्यान याविषयीचे ट्विट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील केला आहे.