OBC reservation : ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत जाहीर निवडणुकांना स्थगिती द्या;पंकजा मुंडे यांची राज्य सरकारला विनंती

304 0

मुंबई : ओबीसी आरक्षणासंदर्भातील सुनावणीला आज सुप्रीम कोर्टाने स्थगित केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या प्रयत्नांमुळे ओबीसी आरक्षण मिळेल असा विश्वास आहे. मात्र आरक्षण मिळेपर्यंत सध्या जाहीर झालेल्या निवडणुकांना स्थगिती द्यावी,अशी विनंती भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे.

यावेळी त्या म्हणाल्या की,”उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील मी विनंती करणार आहे.” दरम्यान राज्य निवडणूक आयोगाकडे या विषयावर बोलून राज्यातील 92 नगर परिषदांच्या निवडणुकांना तोपर्यंत स्थगिती द्यावी अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे. तरच हा ओबीसींसाठींचा न्याय असेल अशी भूमिका पंकजा मुंडे यांनी घेतली असून त्यांच्या या विनंतीवर राज्य सरकार काय निर्णय घेते हे लवकरच समजेल.

Share This News
error: Content is protected !!