Top News Marathi Logo

Maharashtra Political Crises : “अब सभी को सभी से खतरा है…!” संजय राऊतांचे ‘ते’ ट्विट चर्चेत

260 0

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची धुरा संभाळल्यानंतर मंत्रिमंडळ स्थापन करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र सर्वोच्च न्यायालयाचा बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लांबणीवर गेल्याने पुन्हा मंत्रिमंडळ स्थापनेच्या हालचाली थंडावल्या आहेत.                                                                                                                                                    एकीकडे राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करून एक ट्विट केले आहे.

 

या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले आहे की, ” अब सभी को सभी से खतरा है…” हे ट्विट केल्यानंतर एका पत्रकार परिषदेमध्ये देखील संजय राऊत यांनी एक सूचक विधान केले आहे.
दरम्यान ते म्हणाले की, ” हे भविष्यात कळेलच की कुणाला कुणापासून धोका आहे. आम्हाला कुणापासूनही धोका नाही. जे व्हायचे होते ते होऊन गेले. पण भविष्यात कुणीही राजकारणात स्वतःला सुरक्षित समजू नये. सगळ्यांच्याच हातात जंजीर आहे. त्यामुळे प्रत्येकाला प्रत्येकापासून धोका आहे.” असं ते म्हणाले आहेत.

Share This News
error: Content is protected !!