“शिंदे साहेब भाजपची जनमानसातील उरलीसुरली लोकप्रियता संपवतील”;अमोल मिटकरींनी भाजपला पुन्हा डीवचले…

283 0

मुंबई:शिवसेनेमध्ये आलेला भूकंप,एकनाथ शिंदे यांनी केलेली बंडखोरी आणि त्यानंतर सत्ता स्थापनेच्या भाजपच्या वेगवान हालचाली यावर राजकीय आणि जनमानसातून देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची घेतलेली.देवेंद्र फडणवीस यांच्या उपमुख्यमंत्री पदी शपथ घेण्यावरून अनेकांनी टीका केली आहे.
एकनाथ शिंदे हे भाजपचे मुख्यमंत्री असल्याची एकीकडे टीका होत असताना, अमोल मिटकरी यांनी देखील शिंदे-फडणवीस सरकारवर खोचक भाषेत टिप्पणी केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करून,”शिंदे साहेब भाजपची जनमानसातील उरलीसुरली लोकप्रियता संपवतील” अशी टीका केली आहे.

या ट्विटमध्ये अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे की, “सद्यस्थितीत महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे देवेंद्र फडणवीस दुसऱ्या,चंद्रकांत पाटील तिसऱ्या,तर इतर भाजप नेते चौथ्या आणि पुढच्या नंबरवर फेकले गेले आहेत. विश्वास आहे शिंदे साहेब भाजपची जनमानसातील उरलीसुरली लोकप्रियता लवकरच संपवतील.

Share This News
error: Content is protected !!