पुणे : “कुणाकडे तक्रार करायची तर करा,मी कुणाला घाबरत नाही….”अशी धमकी देऊन शाळेतील पिटी शिक्षकानेच अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार,पुणे महापालिकेच्या शाळेत पिटीचे क्लास घेणाऱ्या एका कंत्राटी पद्धतीने नेमलेल्या शिक्षकाने अल्पवयीन मुलींचा विनयभंग केला आहे. याप्रकरणी खडक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून,मोहम्मद कयूम अंसारी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महात्मा फुले पेठ परिसरातील महानगरपालिकेच्या शाळेतील पिटीचे क्लास घेणाऱ्या अन्सारी याने अल्पवयीन मुलींना पिटी शिकवताना त्यांना अयोग्य ठिकाणी हात लावणे,वाईट हेतूने स्पर्श करणे तसेच अश्लील भाषेचा वापर करून विनयभंग केला आहे.तसेच “कुणाकडे तक्रार करायची तर करा,मी कुणाला घाबरत नाही”अशी धमकी देखील या पिटी शिक्षकाने दिल्याचे घडकीस आले आहे.
खडक पोलीस पथकाने आरोपी मोहम्मद कयूम अन्सारी याला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे
