“आम्हाला आणखी बरीच मुले हवी आहेत”! आलियाच्या प्रेग्नेंसी न्यूजवर रणबिर कपूरची प्रतिक्रिया

406 0

मुंबई :रणबिर कपूर आणि आलिया भट या जोडप्याने काही महिन्यांपूर्वीच घरातच साधेपणाने लग्न गाठ बांधली.निवडक पाहुणे आणि जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत या दोघांनी आपल्या नात्याला नाव दिले.रणबीरच्या आयुष्यात आलीयाने पत्नी म्हणून एन्ट्री केल्यानंतर अभिनेता रणबीर कपूरच्या रील लाईफ आणि रियल लाईफ मध्ये आनंदाचे दिवस आले आहेत.

लवकरच रणबीरचे 2 चित्रपट बॉक्स ऑफिसवर धडकणार आहेत. 4 वर्षानंतर रणबिर कपूर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर चाहत्यांना दिसणार आहे. ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटांमध्ये आलिया आणि रंगबीर सोबत दिसणार आहेत. हा चित्रपट 9 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.

तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यातली गोड बातमी देखील रणबीरने त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. लवकरच रणबीर बाबा होणार असल्याची माहिती एव्हाना सर्वांनाच समजली आहे.

एका मीडिया टीमशी बोलताना रणबीरला विचारण्यात आले की,तो बाबा होणार आहे ही बातमी समजल्यानंतर त्याला कसे वाटले.यावर रणबीर म्हणाला की “मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी आहे.आलिया आणि मी बऱ्याच काळापासून याबद्दल बोलत आहोत,आणि आम्हाला आमच्या आयुष्यात आणखी बरीच मुले हवी आहेत. आम्ही सध्या आमच्या आयुष्याच्या चांगल्या टप्प्यात आहोत” अशा भावना रणबिर कपूरने व्यक्त केल्या आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!