पुणे: पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी मध्ये पावसाने आज विश्रांती घेतली आहे.८ जुलै पर्यंत चारही धरणांचा उपयुक्त पाणीसाठा ५.७१ टीएमसी झाला आहे.आज खडकवासला २ मिमी, – पानशेत २० मिमी, वरसगाव १७ मिमी आणि टेमघरधरणा च्या पाणलोट क्षेत्रात २५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षी या दिवशी धरणांचा पाणीसाठा ८.६८ टीएमसी इतका होता.
