पंढरपूर यात्रेस जाणाऱ्या वाहनांना पथकरातून सूट मिळण्यासाठी पासची सुविधा

284 0

पुणे: पंढरपूर यात्रेला जाणाऱ्या पालख्या, भाविक आणि वारकऱ्यांच्या वाहनाला पथकरातून सूट मिळण्यासाठी परिवहन विभागाकडून स्टिकर्स किंवा पास घेणे आवश्यक असून त्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे तसेच संबंधित पोलीस स्टेशन येथे सुविधा करण्यात आली आहे.

पंढरपूरला जाताना आणि येताना १५ जुलै २०२२ पर्यंत या कालावधीत पालख्या, भाविक आणि वारकऱ्यांच्या हलक्या आणि जड वाहनासाठी ही सुविधा असेल. संबंधितांनी वाहन क्रमांक, चालकाचे नावासह अर्ज करून पास प्राप्त करून घ्यावा, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांनी कळविले आहे.

Share This News
error: Content is protected !!