मुंबई: मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला स्पेशल प्रोटोकॉल नको, असा आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला आहे. ताफ्यासाठी लागू केलेल्या विशेष प्रोटोकॉलमुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन त्यांना त्रास सहन करावा लागतो असं म्हणत त्यांनी पोलिस आयुक्त आणि पोलिस महासंचालकांना यासंदर्भात आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा प्रवास करत असताना सुरक्षेच्या कारणास्तव प्रवास मार्गिकेवरील वाहतूक रोखून ठेवण्यात येते. मात्र, त्यामुळे वाहतुकीचा नाहक खोळंबा होऊन वाहनचालकांना मनस्ताप होतो.
ताफ्यासाठी वाहतूक रोखल्याने लोकांना त्रास सहन करावा लागतो, त्यांच्या महत्त्वाच्या कामांचा खोळंबा होतो. रुग्णवाहिका अडकल्यास रूग्णाच्या जीवितासही धोका होऊ शकतो. हे सर्वसामान्यांचे सरकार असून त्यात व्हीआयपींपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना प्राधान्य राहील- मुख्यमंत्री @mieknathshinde
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 8, 2022
ताफ्यासाठी वाहतूक रोखल्याने लोकांना त्रास सहन करावा लागतो, त्यांच्या महत्त्वाच्या कामांचा खोळंबा होतो. रुग्णवाहिका अडकल्यास रूग्णाच्या जीवितासही धोका होऊ शकतो. हे सर्वसामान्यांचे सरकार असून त्यात व्हीआयपींपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना प्राधान्य राहील असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.