काँग्रेस ऍक्शन मोडमध्ये ;’त्या’ आमदारांवर होणार शिस्तभंगाची कारवाई ?

213 0

दिल्ली:काही दिवसांपूर्वी झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या पहिल्या क्रमांकाच्या उमेदवाराला काही आमदारांनी मतदान केले नाही.त्याचबरोबर विश्वास मताच्या वेळी गैरहजर राहिल्या प्रकरणी अशा आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे संकेत पक्षश्रेष्ठींनी दिले असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
याप्रकरणी नाना पटोले यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची गुरुवारी भेट घेऊन अहवाल सादर केला. क्रॉस वोटिंग आणि विश्वासमताच्या वेळी गैरहजर राहिलेल्या आमदारांच्या हेतूवर संशय व्यक्त करण्यात आला आहे.पहिल्या पसंतीची मते न मिळाल्यामुळे विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव झाला.
या पार्श्वभूमीवर पटोले यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेसचे नेते राहुल गांधी,सरचिटणीस के सी विणुगोपाल यांची भेट घेऊन अहवाल सादर केला. त्यानुसार या सात आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाऊ शकते याचे स्पष्ट संकेत पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत.

Share This News
error: Content is protected !!