काय झाडी,काय डोंगर…!फेम आमदार शहाजी बापू पाटील थोडक्यात बचावले

235 0

मुंबई:काय झाडी,काय डोंगर,काय हॉटेल,समद ओके मंदी हाय…!डायलॉगने प्रसिद्धी झोतात आलेले सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील एका अपघातात थोडक्यात बचावले आहेत.त्यामुळे सध्या तरी त्यांचे समद ओके नाही असंच म्हणावं लागेल.

मिळालेल्या माहितीनुसार,मुंबईतील आमदार निवासमध्ये आमदार शहाजी बापू पाटील ज्या खोलीत राहतात,त्या खोलीचा छताचा भाग अचानक कोसळला. ही दुर्घटना घडली तेव्हा शहाजी बापू पाटील हे खोलीतच होते.परंतु सुदैवाने ते बचावले आहेत.

Share This News
error: Content is protected !!