रात्री ‘असे’ वेषांतर करून एकनाथ शिंदे यांची भेट घेत होते देवेंद्र फडणवीस;पत्नी अमृता यांनी ‘सीक्रेट मिशन’चा केला असा खुलासा…

173 0

महाराष्ट्र:उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी राजकीय उलथा पालथीनंतर एक मोठा खुलासा केला आहे.शिवसेनेमध्ये आलेल्या भूकंपानंतर महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे.दरम्यान या राजकीय घडामोडींवर बोलताना मिसेस उपमुख्यमंत्री यांनी देवेंद्र फडणवीस हे कशाप्रकारे वेगवेगळी वेशभूषा करून एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी जात होते,यावर भाष्य केले आहे.                                                                                                          यावेळी अमृता फडणवीस म्हणाल्या की,देवेंद्र फडणवीस हे रात्री वेगवेगळी वेशभूषा करून एकनाथ शिंदे यांना भेटायला जात होते.वेगवेगळे कपडे आणि मोठे गॉगल घालून ते घराच्या बाहेर पडायचे.अनेक वेळा ते अशी वेशभूषा करायचे,की मला देखील त्यांना ओळखणे कठीण होत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील विधानसभेमध्ये भाषण करत असताना ते स्वतः कशा प्रकारे पक्षाचे इतर नेते झोपल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी बाहेर पडत होतो.आणि त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर इतर नेते पुन्हा जागे होण्यापूर्वी घरी परत येत होतो.असे वक्तव्य केले.यावर खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मान हलवून मिश्किल पद्धतीने सहमती दर्शवली होती.
अमृता फडणवीस म्हणाल्या की,”सामान्यतः देवेंद्र हे रात्री उशिरापर्यंत काम करत असतात.परंतु अचानक ते जॅकेट आणि गॉगल लावून रात्री बाहेर पडत असे.यावरून मोठे काहीतरी घडणार आहे असा अंदाज येत होता.”दरम्यान शिवसेनेतील अंतर्गत वादंगावर बोलत असताना त्या म्हणाल्या की,”आपण सर्वांनी एकनाथ शिंदे यांचे भाषण ऐकले आहे.त्यांच्या भाषणातून शिवसेनेतील सर्वच आमदारांमध्ये किती असंतोष होता हे लक्षात येते.त्यांच्या याच असंतोषामुळे उद्धव ठाकरे सरकारला पायउतार व्हावे लागले”असे देखील त्या म्हणाल्या आहेत.

Share This News
error: Content is protected !!