खडकवासला धरण साखळीत जोरदार पाऊस;पुणेकरांवरचे पाणी कपातीचे संकट टळणार

282 0

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत गेल्या 12 तासात जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे पानशेत, वरसगाव,टेमघर आणि खडकवासला या चारही धरणांचा एकूण पाणीसाठा 2.96 झाला आहे.

       सोमवारी सायंकाळी हा पाणीसाठा 2.76 टीएमसी होता तो मंगळवारी सकाळी 0.20 ने वाढून 2.96 झाला असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. या चारही धरणात अद्यापही पाऊस सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात ओढे, नाले तसेच आसपासच्या परिसरातून पाणी येत असल्याने हा साठा आणखी वाढेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार, खडकवासला 19 मिमी, पानशेत 50 मिमी, वरसगाव 53 मिमी तर टेमघर धरणात सर्वाधिक 66 मिमी पावसाची नोंद गेल्या 24 तासात झाली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!