पोलिसांची मोठी कारवाई, भंगारवाल्याकडे सापडली जिवंत काडतुसे आणि बुलेट लीड

630 0

पुणे- पुणे पोलिसांनी पर्वती भागातील एका भंगाराच्या दुकानातून तब्बल 1105 काडतुसे जप्त केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यापूर्वी पुणे पोलिसांनी केलेल्या ‘ऑल आऊट ऑपेरेशन’ कारवाईत मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी एका भंगार व्यावसायिकाला ताब्यात घेतले आहे.

दिनेशकुमार कल्लू सिंग सरोज असे या भंगार व्यावसायिकाचे नाव आहे. त्याच्या दुकानातून 56 जिवंत काडतुसे, 79 खराब काडतुसे आणि 970 बुलेट लीड अशी एकूण 1105 काडतुसे गुन्हे शाखा पोलिसांनी जप्त केली आहेत.

जप्त करण्यात आलेल्या काडतूसाची किंमत 1 लाख 65 हजार 900 रुपये आहे. आरोपीनं एवढ्या मोठ्या प्रमाणात काडतुसे आणली कुठून? काडतुसे आणली कशासाठी? काडतुसे जवळ का बाळगल्या? यापूर्वी त्याने इतर कोणाला काडतुसे किंवा अग्नी शस्त्रे दिली आहेत काय? याबाबत पुणे पोलीस दिनेशकुमार कल्लूसिंग सरोजकडे सखोल चौकशी करत आहेत.

या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Share This News
error: Content is protected !!