राष्ट्रवादी पिंपरी विधान सभेच्या कार्याध्यक्षपदी इखलास सय्यद यांची नियुक्ती

379 0

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस च्या पिंपरी विधानसभेच्या कार्याध्यक्ष पदी इखलास सय्यद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहराध्यक्ष अजित गव्हाणे व पिंपरी विधान सभेचे अध्यक्ष शाम लांडे यांनी सय्यद यांना नियुक्ती पत्र दिले.

प्रभावी संघटन कौशल्य, उत्तम वक्ता, नागरिकांच्या प्रश्नांची जाण असणारा, शासकीय कामांचा प्रदीर्घ अनुभव असणारा व आकुर्डीतील अभ्यासू आणि हुशार कार्यकर्ता अशी इखलास सय्यद यांची ओळख आहे.गेल्या पंधरा वर्षांपासून आकुर्डी भागात सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचे कार्य असून आकुर्डीतील राष्ट्रवादीचा अनुभवी चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.

शहराध्यक्ष अजित गव्हाणे, पिंपरी विधान सभेचे अध्यक्ष शाम लांडे, ज्येष्ठ नेते आझम भाई पानसरे, आमदार आण्णा बनसोडे, विरोधी पक्ष नेते राजू मिसाळ, जगदीश शेट्टी यांनी दिलेली जबाबदारी चांगल्या रीतीने पार पाडू व पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवणे, पक्ष संघटन मजबूत करणे, शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना मिळवून देणे यावर जास्त भर देणार असल्याचे इखलास सय्यद यांनी सांगितले.

Share This News
error: Content is protected !!