‘… तर अनिल देशमुख फरार होतील’, केतकी चितळेची अनिल देशमुख यांच्या विरोधात याचिका

521 0

मुंबई- शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणारी अभिनेत्री केतकी चितळे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. केतकी चितळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. केतकीने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे.

सध्या राज्यसभा निवडणुकीवरून महाराष्ट्रात मोठे राजकारण रंगले आहे. लवकरच मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 100 कोटी वसुली प्रकरणात अनिल देशमुख सध्या सीबीआयच्या ताब्यात आहेत. येत्या 10 जून रोजी राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. सध्या तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांचे मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मतदान करण्याचा हक्क मिळावा यासाठी अनिल देशमुख त्यांनी जामीन अर्ज दाखल केला आहे.

त्यावर केतकी चितळे हिने अनिल देशमुख यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे.अनिल देशमुख यांना जामीन देऊ नये. जर देशमुखांना जामिन दिल्यास ते फरार होतील”, फरार झाले की ते पुन्हा मिळून येणार नाहीत, असा दावाच केतकीने केला आहे.

Share This News
error: Content is protected !!