राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुण्यात ‘स्पार्क अकॅडमी’चं उद्घाटन

410 0

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते रविवार पेठ पुणे येथे ‘स्पार्क अकॅडमी’ या केंद्रीय लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा प्रशिक्षण – मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिकेचे उदघाटन करण्यात आले.

श्री मुकुंद भवन ट्रस्ट तसेच विवेक व्यासपीठ यांच्या माध्यमातून गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी हे परीक्षापूर्व तयारी केंद्र चालविले जाणार आहे.


स्पार्क अकॅदमी उदघाटन सोहळ्याला हिंदुस्तान प्रचार संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे, माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित, विवेक व्यासपीठचे दिलीप करंबेळकर, श्री मुकुंद भवन ट्रस्टचे विश्वस्त पुरुषोत्तम लोहिया, अकॅडेमीचे प्रमुख किशोर दरक अणि कार्यवाह महेश पोहनेरकर प्रमुख्याने उपस्थित होते.

Share This News
error: Content is protected !!