अहिल्यादेवी होळकर जयंती : चौंडीच्या वेशीवर पोलिसांनी अडवला गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचा ताफा

414 0

अहमदनगर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 297 व्या जयंती निमित्त चोंडी येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी येत असताना पोलिसांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचा ताफा चोंडीच्या वेशीवर अडवला. त्यामुळे या ठिकाणी मोठे नाट्य रंगले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आज चौंडी येथे अहिल्यादेवींच्या जयंती सोहळ्यास उपस्थित आहेत. गोपीचंद पडळकर यांच्या अहिल्यादेवी जागर यात्रेचा समारोप आज चौंडीत होत आहे. त्यामुळे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या दिवशी शरद पवार आणि गोपीचंद पडळकर हे आमने-सामने येऊन राजकीय संघर्ष होण्याची चिन्ह असल्याने खबरदारी म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत चौंडीच्या दिशेने येत असताना त्यांचा ताफा पोलिसांकडून अडवण्यात आला.

त्यामुळे येथील वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झाले असून पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांत बाचाबाची सुरू झाल्याचं पहायला मिळत आहे. तसेच भाजपचे कार्यकर्ते गोपीचंद पडळकर यांच्या बाजूने जोरदार घोषणाबाजी सुद्धा करत आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!