दापोली रिसॉर्ट प्रकरणी विभास साठे यांच्या जीविताला धोका, किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली भीती

368 0

मुंबई- दापोली रिसॉर्ट प्रकरणातील व्यावसायिक विभास साठे यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी सोमय्या यांनी केली आहे. साठे यांच्या जीविताला धोका असल्याची भीती सोमय्यांनी व्यक्त केली असून या संबंधी त्यांनी महाराष्ट्र पोलीस महासंचालकांना पत्र लिहिले आहे.

ईडीने 26 मे रोजी राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या निवासस्थानासह त्यांच्याशी संबंधित सात ठिकाणी छापा मारला होता. यामध्ये दापोलीतील रिसॉर्टची कथित विक्री परब यांना करणारे विभास साठे यांच्या निवासस्थान, कार्यालयाचाही समावेश यात होता. अनिल परब यांच्यावरील कथित रिसॉर्ट प्रकरणी कारवाई सुरू झाल्यानंतर अनिल परब यांच्यावर वारंवार आरोप करणारे भाजपचे किरीट सोमय्या यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे.

या प्रकरणातील व्यावसायिक विभास साठे यांचा मनसुख हिरण होण्याची भीती किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली असून साठे यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी सोमय्या यांनी केली आहे. साठे यांच्या जीविताला धोका असल्याचे सांगत सोमय्यांनी महाराष्ट्र पोलीस महासंचालकांना पत्र लिहिले आहे.

किरीट सोमय्या यांनी म्हटले की, राज्याचे मंत्री अनिल परब रिसॉर्ट घोटाळाची चौकशी आणि कारवाई सुरू आहे. परब यांनी विभास साठे कडून जमीन घेतली होती. विभास साठे यांचे “मनसुख हिरण” होऊ नये. विभास साठे यांच्या जिवाला असलेला धोका लक्षात घेऊन त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था महाराष्ट्र पोलिसांनी करावी अशी विनंती मी महासंचालक यांना केली असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे.

 

Share This News
error: Content is protected !!