Aashadhi Ekadashi 2023

Aashadhi Ekadashi 2023 : ‘मुंबईच्या “लोकल “मध्ये दुमदूमला विठ्ठल नामाचा गजर; पोलिसांनीदेखील घेतला सहभाग

544 0

मुंबई : आज आषाढी एकादशी निमित्त (Aashadhi Ekadashi 2023) विठ्ठल नामाच्या गजराने संपूर्ण पंढरपूर दुमदुमल आहे. सकाळी मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा केली. पंढरपुरात महाराष्ट्रातून आणि परराज्यांमधून भाविकांचा मेळा दाखल झाला आहे. संपूर्ण महाराष्ट्रच आज (Aashadhi Ekadashi 2023) विठ्ठल नामाच्या गजरात तल्लीन झाला आहे.

Pune Police News : सदाशिव पेठमध्ये तरुणीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलीस हवालदारासह 3 जण निलंबित

आषाढी एकादशी निमित्त (Aashadhi Ekadashi 2023) काही भाविकांना पंढपुरात जाता आलं नसलं तरीही, आज भाविक ठिकठिकाणी असलेल्या विठ्ठल मंदिरांमध्ये हा सोहळा साजरा करत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह संचारला असल्याचं पाहायला मिळत आहे.

Tripura Rath Fire Video: धक्कादायक ! जगन्नाथ रथाला लागलेल्या आगीत 2 चिमुकल्यांसह 6 जणांचा होरपळून मृत्यू

मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळख असलेल्या, मुंबई लोकलमध्ये भजनी मंडळी आणि रेल्वे प्रवाशांनी भजनाचे गायन करत आषाढी एकादशी (Aashadhi Ekadashi 2023) मोठ्या उत्साहात साजरी केली. त्यावेळी लहान मुलांनी विठ्ठल, संत ज्ञानेश्वर महाराज ,संत तुकाराम महाराज , पोलीस ,डॉक्टर यांच्या वेशभूषा करून उपस्थित दर्शवली होती. या सुखसोहळ्याला पोलीस कर्मचाऱ्यांनीसुद्धा मनोभावे हजेरी लावली.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide