Matsyasana

Matsyasana : मत्स्यासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

392 0

हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितले आहे,  जेव्हा पृथ्वीवर प्रलय आला होता आणि संपूर्ण पृथ्वी पाण्याखाली बुडाली होती तेव्हा भगवान विष्णूंनी मत्स्य अवतार धारण केला होता. या अवतारामध्ये माशाचे रूप घेतले होते. त्यांनी या प्रलयामध्ये सगळ्या लोकांची मानवी नाव तयार करुन त्यांचे संतुलन बनवून बाहेर काढले होते. मत्स्यासन सुद्धा योग साधकाची अशीच मदत करू शकते. य आसनामध्ये शरिर माश्याच्या मुद्रेत दिसते. हे आसन शरिर आणि मनाचे तसेच संतुलन राखते जसे मत्स्यावतारामध्ये भगवान विष्णूंनी धरती आणि समुद्रामध्ये बनवले होते.

मत्स्यासन कसे करावे?
• योग मॅटवर पाठीवर झोपावे, आपले पाय एकमेकांना जुळलेले असायला हवेत, तसेच आपले शरीर आरामात टेकवावे.
• आपले हात हिप्सखाली ठेवावे, हात जमिनीच्या दिशेने असतील. आता आपले कोपर एकमेकांच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करा.आपले दोन्ही कोपर कंबरेजवळ असतील.
• पायाची मंडी घालावी. मांड्या आणि गुडघे फरशीवर सरळ राहतील.
• श्वास घेत घेत छाती वरच्या बाजूला उचलावी. डोके वरच्या बाजूला उचलावे आणि डोक्याचा वरचा भाग जमिनीला स्पर्श करेल या स्थितीत यावे.
• शरीराचे संपूर्ण वजन फक्त कोपरावर किंवा फक्त डोक्यावर येणार नाही याची काळजी घ्या.
• जसजसे छातीचा भाग उचलला जाईल तसतसा खांद्याच्या मसल्सवर हलकासा दबाव पडत असल्याचे जाणवेल.
• या स्थितीमध्ये तोपर्यंत रहा जोपर्यंत आपल्याला शक्य असेल. श्वासाची गती नॉर्मल राहू द्या.
• श्वास बाहेर सोडत हळू हळू पूर्वस्थितीत या.
• सगळ्यात आधी डोके उचला आणि त्यानंतर छाती जमिनीच्या दिशेने घेऊन या. पाय सरळ करून या स्थितीत आराम करा.

मत्स्यासन करण्याचे फायदे
• मत्स्यासन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. जसे की,
• या आसनाच्या अभ्यासामुळे शरीराचे पोषण करणारे घटक शोषले जातात.
• मत्स्यासन मान आणि छातीचे स्नायूंमध्ये तणाव निर्माण करते. तसेच खांदा आणि मानेचे स्नायू तणावमुक्त करतात.
• हे श्वास घेण्याच्या प्रणालीला सुधारण्यामध्ये मदत करतात. श्वासाच्या वेगवेगळ्या समस्या दूर करायला हे एक चांगले आसन आहे.
• मत्स्यासनाच्या सरावामुळे पिट्यूटरी, पॅराथायरॉईड आणि पीनल ग्लॅंड्स टोन होतात.
• हे पाठीला स्ट्रेच करायला मदत करते आणि टोन करायला मदत करते. या आसनामुळे पाठ आणि कमरेच्या दुखण्यापासून आराम मिळतो.
• हे पाठीच्या वरच्या भागाला आणि मानेच्या मागच्या मसल्सला मजबूत बनवते.
• हे आसन हिप्सचे जोड आणि मसल्सला चांगला स्ट्रेच मिळतो.
• या आसनाच्या नियमित अभ्यासामुळे मानेच्या समोरच्या आणि पोटाच्या खालच्या भागातील मसल्स अ‍ॅक्टीव्ह होतात.
• यामुळे गळा आणि पचनाच्या अवयवांचा चांगला मसाज होतो.
• हे आसन पोश्चर सुधारायला मदत करते.

जर तुम्ही दिवसभर काम करता करता थकून जात असाल आणि तुम्हाला कॉफी घ्यायची इच्छा होत असेल तर तुम्ही मत्स्यासनाचा सराव नियमितपणे करायला हवा. कारण आपण काम करताना आलेला थकवा, दिवसभर ऊर्जा टिकवणे यासारख्या गोष्टींसाठी या आसनामुळे खूप मदत होते. आपल्याला दिवसभर ताजेतवाने वाटत राहते.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!