धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं, या मागणीसाठी दीपक बोऱ्हाडे हे बीडच्या जालना येथे आमरण उपोषणाला बसले होते. मात्र आता तब्बल १६ दिवसांनंतर दीपक बोऱ्हाडे (deepak borhade) यांनी उपोषण सोडलं आहे.दीपक बोऱ्हाडे यांची प्रकृती खालावली होती, तसेच समाजाच्या विनंतीला मान देऊन त्यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला. त्याची त्यांची मुलगी आणि मावशीच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडलं आहे.
आरक्षणाच्या मागणीचं काय ?
सरकारच्या शिष्टमंडळाने दीपक बोऱ्हाडे यांची भेट घेतली होती. मंत्री पंकजा मुंडे, गिरीश महाजन, आमदार अर्जुन खोतकर, आमदार नारायण कुचे यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. त्यावेळी महाजन यांनी उपोषण सोडण्याची विनंती केली होती, मात्र बोराडे यांनी उपोषण मागे घेतले नव्हते. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बोऱ्हाडे यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती. फडणवीस म्हटले होते की, कोणीही काहीही बोलू द्या. मी काही लिहून दिलं तरी जोपर्यंत मी चर्चा करत नाही तोपर्यंत मार्ग निघणार नाही. लोकांनी केसेस केल्या आहेत. मात्र आरक्षणाबाबत आपण आपली बाजू मांडली आहे. सर्वोच्च न्यायालयामुळेही यात अडचणी निर्माण झाल्या. एसटीचे आरक्षण केंद्र सरकार राष्ट्रपतींच्या मान्यतेने देते. त्यासाठी राज्य सरकारला अहवाल द्यावा लागतो. मागच्या सरकारने धनगर समाज एसटीत बसत नाही, असा अहवाल पाठवला. मात्र आरक्षण अजूनही आपल्याला हातून गेलेलं नाही. चांगला वकील द्यावा लागणार आहे, तुम्ही प्रक्रिया समजून घ्या. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय आरक्षण मिळू शकतात नाही. तुम्ही चर्चा करा आपण मार्ग काढू.’
मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर आता दीपक बोऱ्हाडे यांनी उपोषण सोडलं आहे. त्यामुळे बोराडे हे आता उपचार घेणार आहेत. प्रकृती सुधारल्यानंतर सरकारसोबत मागण्यांच्या संदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यानंतरही जर हा प्रश्न सुटला नाही तर पुन्हा मोठं जनआंदोलन उसळेल.