Bakasana

Bakasana : बकासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

497 0

आशियामध्ये, बगळ्याला प्राचीन काळापासूनच समृद्धी आणि युवावस्थाचे प्रतीक मानले जाते. चीनमध्ये बगळे हे दीर्घायुष्याचे प्रतीक मानले जाते. बकासन/काकासनात या तिन्ही प्रतिकांचा समावेश होतो आणि या आसनाच्या सरावाने हे तिन्ही मुख्य गुण तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनू लागतात. हे आसन पूर्ण आत्मविश्वासाने करायला थोडा वेळ लागतो. पण, एकदा का तुम्हाला याची सवय झाली की तुम्हाला ते अगदी सोपे वाटायला लागते. या आसनामुळे तुमचा जीवन जगण्याचा दृष्टिकोन देखील बदलू शकतो.

बकासन करण्याची योग्य पद्धत
• बकासनाची सुरूवात पर्वतासन पासून करा

• तुमचे दोन्ही पाय जवळ आणा आणि हात जमिनीवर ठेवा.

• लक्षात ठेवा तुमचे दोन्ही हात खांद्याच्या रुंदीएवढे जमिनीवर असावेत.

• आता तुमचे हिप्स वरती उचला.

• गुडघे वरच्या ट्रायसेप्सच्या जवळ येत असल्याने ताण कोर स्नायूंमध्ये असेल.

• काकासनासाठी, कोपर किंचित वाकवा जेणेकरुन गुडघे वरच्या हातांवर राहू  शकतील.

• पुढे पहा आणि हळू हळू आपले पाय जमिनीवरून उचला.

• शरीराचे वजन हळूहळू हातावर आणा.

• काही सेकंद या आसनात राहा.

• जर, बकासन करायचे असेल तर तुम्हाला तुमचे हात मजबूत करावे लागतात.

• पाय हळूहळू खाली आणा आणि उत्तानासनात बसा.

बकासनाचे फायदे
बकासन हे मध्यवर्ती/मूलभूत स्तरावरील अडचणीचे हठयोग आसन आहे. हे एका वेळी जास्तीत जास्त 30 ते 60 सेकंदांसाठी केले पाहिजे. हे आसन केल्याने पाठीच्या वरच्या भागाला ताण येतो. तर हात,पोटाचा खालचा भाग आणि मनगट मजबूत होतात. हे आसन करण्यासाठी मजबूत कोर स्नायू मजबूत बेस तयार करतात. मजबूत कोर स्नायू हे तुम्हाला तुमचे गुडघे जमिनीवरून उचलून तुमच्या वरच्या हातांजवळ आणण्याची ताकद देतात. याच्या सततच्या सरावाने शरीर इतके हलके होते की संपूर्ण शरीराचे वजन उचलण्याची ताकद मनगटात येते.

याशिवाय बकासनाचे अनेक फायदे आहेत. जसे,
• हे आसन तुमचे  मनगट आणि हात मजबूत बनवतात.

• पाठीचा कणा टोन्ड आणि मजबूत होतो.

• वरच्या पाठीला चांगला ताण येतो.

•  या आसनाने तुमच्या शरीराचे संतुलन आणि फोकस सुधारते.

• तुमचे मन आणि शरीर आव्हानांसाठी तयार होऊ लागते.

• खालच्या पोटाचे स्नायू मजबूत होतात आणि पचनक्रिया सुधारते.

• मांडीचे आतील स्नायू मजबूत होऊ लागतात.

• रोज सराव केल्यास, तुम्हाला आतून स्ट्रॉंग वाटते आणि आत्मविश्वास वाढतो.

तुम्हाला खालील समस्या असल्यास बकासन करणे टाळा
•  कार्पल टनल सिंड्रोम (Carpal tunnel syndrome)

•  मनगटात किंवा शरीराच्या कोणत्याही स्नायूमध्ये वेदना

याशिवाय, इतर कोणतीही गंभीर वैद्यकीय समस्या असल्यास, बकासनाचा सराव करण्यापूर्वी कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या. या योगा आसनाचा सराव केवळ प्रशिक्षित योग प्रशिक्षकाच्या देखरेखीखाली करा.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!