Breaking News
Eknath Shinde

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांचे स्टेरिंग नातवाच्या हाती; नातू बनला आजोबांचा सारथी

502 0

सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) दोन दिवसांच्या सुट्टीवर साताऱ्यातील दरे गावी आले आहेत. आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या नातवाला शेतात नेले. यावेळी मुख्यमंत्र्यांचा नातू हा आजोबांचा सारथी झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच शेतात गेल्यानंतर आपल्या हाताने नातू रुद्राक्षला स्ट्रॉबेरी देखील भरवली. मुख्यमंत्री आपल्या कुटुंबासह नातवाला घेवून मूळ दरे गावी आले आहेत.

मनोज जरांगे- पाटील मुंबईला निघालेले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या गावी कुटुंबासह गेल्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्यातच आता नातवासोबत स्ट्राॅबेरी चारतानाचा व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाल्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे.

Share This News
error: Content is protected !!