देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ पुण्यात भाजपाचं आंदोलन

215 0
  1. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी नोटीस दिली आहे. त्याचा निषेध करण्यासाठी रविवारी पुण्यात भाजप तर्फे आंदोलन करण्यात आले.

 

हे निषेध आंदोलन पुण्यात महानगरपालिका जवळ करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केले. या आंदोलनाला महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपचे पुणे प्रवक्ते पुष्कर तुळजापूरकर, नगरसेवक धीरज घाटे ,गणेश घोष यांच्यासह भाजप, युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या आंदोलनाच्या वेळी महविकास आघाडी सरकारने सूड बुद्धीने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पोलीस चौकशीची नोटीस दिली म्हणून महाविकास आघाडी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.

Share This News
error: Content is protected !!