जंगल म्हंटले कि आपल्या समोर वाघ, सिंह यासारखे शक्तिशाली प्राणी येतात. या जंगलात (Tiger Viral Video) लहान प्राण्यांना नेहमी मोठ्या आणि शक्तिशाली प्राण्यांपासून सुरक्षित राहावं लागतं. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये चक्क एक माकड 2 वाघांवर भारी पडले आहे. हे माकड त्या वाघांना एवढा त्रास देते कि वाघ शेवटी वैतागून घटनास्थळावरून पळून जातात. हा व्हिडिओ सोशल मीडिया साइट X वर @AMAZlNGNATURE नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.
काय आहे व्हिडिओमध्ये?
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कि, दोन वाघ एकत्र बसलेले दिसत आहेत. मग एक माकड वरून उडी मारतं. तो वाघाच्या चेहऱ्यावर मारतं आणि मग पळून जातं. हे पाहून वाघ सावध होतो. तो लगेच रिअॅक्शन देतो. माकडाला पकडण्याचा प्रयत्न करतो, पण तोपर्यंत माकड पळून जातं. काही वेळाने तेच माकड पुन्हा येतं आणि वाघाची शेपटी ओढू लागतं.
Gibbons like to live dangerously pic.twitter.com/kNHbYI0TDd
— Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) November 16, 2023
माकड वाघाचे कान धरतं आणि ओढतं. त्यामुळे वाघाला राग येतो. वाघ त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो, पण माकड पुन्हा पळून जातं. शेवटी दोन्ही वाघ त्या माकडाला वैतागून त्या ठिकणाहून निघून जातात. हा व्हिडिओ आतापर्यंत जवळपास 50 लाख लोकांनी पाहिला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Milk : दुध दर प्रश्नी हस्तक्षेप करा,अन्यथा आंदोलन करू; किसान सभेचा दुग्धविकास विभागाला इशारा
Caste Certificate : 45 दिवसांत मिळेल जात प्रमाणपत्र; ‘या’ कागदपत्रांसह करा अर्ज
Chhagan Bhujbal : छगन भुजबळांना मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून… मनोज जरांगेचा मोठा आरोप