‘मातोश्री’चं घड्याळ आणि ‘डायरी’चं गुऱ्हाळ ! (संपादकीय)

146 0

मातोश्री म्हणजे माझी आई हो : यशवंत जाधव

काही जण आईला ‘आई’ म्हणतात तर काही जण ‘मातोश्री’ म्हणतात : अजित पवार

मातोश्री म्हणजे यशवंत जाधवांची आई असू शकत नाही का : संजय राऊत

आईला इतकं महागडं घड्याळ दिलं असेल तर धन्य ती माता : अतुल भातखळकर

कोण कुणाची मातोश्री, हे कळेलच. चौकशीतून कुणीही सुटणार नाही अगदी “मातोश्री” देखील : चंद्रकांत पाटील

वांद्र्याच्या मातोश्रीला वाचवण्यासाठी यशवंत जाधवांकडून आईचं नाव पुढं : किरीट सोमय्या
………………………..

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांनी ‘मातोश्री’ला भेट दिलेल्या घड्याळानं सध्या मविआ सरकारचे चांगलेच बारा वाजलेत. सध्या राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांच्या डोक्यात याच घड्याळाची टिकटिक वाजू लागलीये मात्र हे 50 लाखांचं घड्याळ वांद्र्याच्या ‘मातोश्री’च्या हातात आहे की यशवंत जाधवांच्या ‘मातोश्री’च्या हातात हे काही कळायला मार्ग नाही.
……………………..

यशवंत जाधव आणि त्यांची डायरी…

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यासह त्यांच्या निकटवर्तीयांवर प्राप्तिकर विभागानं छापे टाकत कारवाई केली. या कारवाई दरम्यान, कोट्यवधींच्या संशयास्पद नोंदी असलेली डायरी प्राप्तिकर विभागाच्या हाती लागली. या डायरीतील एका नोंदीत ‘मातोश्री’ला 50 लाख रुपयांचं घड्याळ तर दुसऱ्या नोंदीत गुढीपाडव्याला ‘मातोश्री’ला 2 कोटी रुपयांची भेट पाठवल्याचा उल्लेख आढळून आला आणि तेव्हापासून या महागड्या घड्याळाची टिकटिक सुरू झाली. आयकर विभागानं पालिका आयुक्त म्हणून इक्बाल सिंह चहल यांनाही नोटीस बजावत जाधव हे स्थायी समितीचे अध्यक्ष असताना एप्रिल 2018 पासून मंजूर झालेल्या कंत्राटांची माहिती मागवली आणि याबाबत चौकशी सुरू असतानाच जाधव यांच्याकडील डायरीतून ‘मातोश्री’ला दिलेलं 50 लाखांचं घड्याळ आणि 2 कोटी रुपयांच्या भेटीची माहिती प्राप्तिकर विभागाच्या हाती लागली.
………………………..

‘मातोश्री’ म्हणजे ‘माझी आई’ हो…!

डायरीत असलेल्या ‘मातोश्री’च्या उल्लेखावरून प्राप्तिकर विभागानं यशवंत जाधव यांची चौकशी केली असता 50 लाख रुपये किमतीचं घड्याळ आपण आपल्या आईला तिच्या वाढदिवसाची भेट म्हणून दिलं होतं तर गुढीपाडव्याला आईच्या स्मरणार्थ आपण गरजूंना 2 कोटींच्या भेटवस्तू दिल्या होत्या, असं त्यांनी सांगितलं.
…………………….

‘घड्याळ’ धावलं ‘मातोश्री’च्या घड्याळासाठी…

झालं… तिकडं यशवंत जाधवांच्या डायरीत महागड्या घड्याळाचा उल्लेख काय झाला इकडं नेतेमंडळींनी सारवासारव करायला सुरुवात केली. ”मातोश्री’ म्हणजे ‘माझी आई’ हो…”, असं म्हणत यशवंत जाधव यांनी सांगताच मविआतील आपल्या प्रमुख घटक पक्षाची बाजू उचलून धरण्यासाठी अजितदादांनीही आपल्या हातातल्या घड्याळात पाहात अचूक टायमिंग साधलं. “अहो, असं काय करता ? काही जण आईला ‘आई’ म्हणतात तर काही जण ‘मातोश्री’ म्हणतात..!” आता आपल्याच पक्षातल्या माणसाची बाजू घेताना संजय राऊत तरी कसे कमी पडणार ? “मी काय म्हणतो, मातोश्री म्हणजे यशवंत जाधवांची आई असू शकत नाही का ?”
……………………….

घड्याळ जरूर बांधा पण ‘मातोश्री’ कोण हे आधी सांगा ?

एकेकाळी सत्तेसाठी ‘घड्याळा’सोबत युती करायला निघालेल्या विरोधकांना जाधवांच्या डायरीतील घड्याळाच्या नोंदीनं आयता चेव चढला. तसा त्यांच्या मनात घड्याळाविषयी काहीच दुजाभाव नाही. हातात बांधतानाही आणि सत्ता मिळवतानाही ! पण घड्याळ भेट दिलं आणि तेही ‘मातोश्री’ला; हे समजताच त्यांना आयती संधी लाभली आणि डागला निशाणा..! ‘कुणी आपल्या आईला इतकं महागडं घड्याळ दिलं असेल तर धन्य ती माता,’ असं म्हणत अतुल भातखळकर यांनी नेम धरला तर ‘कोण कुणाची मातोश्री, हे कळेलच. चौकशीतून कुणीही सुटणार नाही अगदी “मातोश्री” देखील,’ असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी टोला हाणला. आता याप्रकरणी किरीट सोमय्या बोलणार नाहीत, असं होऊ शकतं का ? ‘वांद्र्याच्या मातोश्रीला वाचवण्यासाठी आईचं नाव पुढं केलं,’ असं म्हणत त्यांनीही तोंडसुख घेतलंच !
…………………

एकूणच काय तर यशवंत जाधवांनी 50 लाखांचं घड्याळ भेट दिलं हे तर सिद्ध झालंच आहे आता ते त्यांनी त्यांच्या ‘मातोश्री'(आई) ला दिलंय की वांद्र्याच्या ‘मातोश्री’ला एवढंच समजणं बाकी राहिलंय. तोपर्यंत वाजवा एकमेकांचे बारा…

– संदीप चव्हाण
वृत्तसंपादक, TOP NEWS मराठी

Share This News

Related Post

NCP President Sharad Pawar : “मुलाबाळांच्या प्रतिक्रियेवर मी उत्तर देणं योग्य दिसत नाही …!”

Posted by - July 23, 2022 0
पुणे : नितेश राणेंनी केलेल्या या आरोपावरुन पुण्यामधील एका कार्यक्रमानंतर शरद पवार यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न पत्रकारांनी केला. उद्धव…

क्षणार्धात सायकलस्वारावर कोसळला बॉम्ब, युक्रेनमधील हल्ल्याचा थरारक व्हिडिओ पाहा

Posted by - February 25, 2022 0
नवी दिल्ली – युक्रेनला चारही बाजूंनी घेरून रशियावर सातत्याने हल्ले केले जात आहेत. याच हल्ल्याचा एक थरारक व्हिडिओ समोर आला…

पायरी पुराण..! (संपादकीय)

Posted by - February 12, 2022 0
माझा पत्ता : पुणे महापालिका प्रवेशद्वार/वरून पाचवी पायरी माझा अल्प परिचय : रोज-दररोज माझ्या अंगावरून शेकडो जण पालिकेत ये-जा करत…

दर्जेदार बियाणे, कृषी औजारे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवा – कृषीमंत्री अब्दुल सत्तार

Posted by - September 15, 2022 0
पुणे : शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याच्यादृष्टीने अत्याधुनिक तंत्रज्ञान, सुधारित बियाणे, उत्कृष्ट पद्धतीची खते, दर्जेदार कृषी औजारे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचतील…

बाजार समितीत महाविकास आघाडीचा गुलाल ! कुणाला किती जागा मिळाल्या ?

Posted by - April 29, 2023 0
राज्यातील 147 कृषी उत्पन्न बाजार समित्याच्या जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत आतापर्यंत 72 जागांचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये महाविकास आघाडीला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *