यशवंत जाधवांच्या कोट्यवधींच्या संपत्तीवर आयकर विभागाची टाच; 41 मालमत्ता जप्त

177 0

मुंबई- शिवसेना नेते यशवंत जाधव सध्या आयकर विभागाच्या रडारवर आहेत. त्यामुळे जाधव यांच्याभोवती कारवाईचा फास आणखी आवळताना दिसत आहे. यशवंत जाधव यांच्याशी संबंधित 41 मालमत्तांवर कारवाई करण्यात आली असून या सर्व मालमत्तांना सील ठोकण्यात आले आहे. भायखळ्यातील 31 फ्लॅट्स आणि वांद्रेतील 5 कोटींचा फ्लॅट आयकर खात्याकडून जप्त करण्यात आला आहे.

आयकर खात्यानं काही दिवसांपूर्वी जाधव यांच्या घरी आणि मालमत्तांवर छापे टाकले होते. या छाप्यात त्यांना मिळालेल्या माहितीनंतर आता जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

जप्त करण्यात आलेल्या फ्लॅटपैकी 26 फ्लॅट Newshawk Multimedia Pvt Ltd कंपनीच्या नावे नोंद आहेत. Newshawk Multimedia Pvt Ltd. कंपनीच्या नावे या भाडेकरुंना थेट रोख रक्कम देण्यात आली होती. याशिवाय भायखळामधील इम्पिरियल क्राउन हॉटेल आहे जे यशवंत जाधव यांनी आपल्या सासूच्या नावे खरेदी केलं होतं. वांद्रे येथील फ्लॅट आणि याशिवाय यशवंत जाधव प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे हाताळणाऱ्या 14 संपत्ती असल्याची माहिती समोर आली आहे.

यशवंत जाधव यांच्या मालकीच्या काही मालमत्ता नातेवाईकांच्या माध्यमातून चालवल्या जात होत्या, त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. यशवंत यांचे पुतणे विनित जाधव आणि मेहुणे मोहिते यांनाही समन्स पाठवण्यात आल्याची माहिती आहे.

यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप जानेवारी महिन्यातच भाजप नेते किरीट सोमय्यांकडून करण्यात आला होता. मुंबईतील कोविड सेंटर उभारणीत मोठा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. तसेच यामध्ये मनी लॉन्ड्रिंग केल्याचाही गंभीर आरोपही सोमय्यांनी जाधवांवर केला होता.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!